जत तालुक्यातील तीन विद्यार्थी युक्रेनमधून परतले

0
जत,मच्छिंद्र ऐनापूरे :
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले जत तालुक्यातील तीन विद्यार्थी युक्रेन या देशातून सुखरूप मायदेशी परतल्याने पालकांनी  सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जत तालुक्यातील यश मनोज पाटील (रा. बिळूर), वैष्णवी गणपती शिंदे ( तिपेहळळी) व यशराज पराग पवार ( रा. जत) हे विद्यार्थी वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी युक्रेन या देशात गेले होते. परंतु रशिया व युक्रेन मध्ये युध्द सुरू झाल्याने हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने त्यांचे पालक चिंतातूर व भयग्रस्त झाले होते.

 

Rate Card
परंतु केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न केल्याने हे विद्यार्थी नुकतेच मायदेशी दिल्ली व पुणे या ठिकाणी परतले असून लवकरच ते आपापल्या गावी पोहचतील. बिळूरचा पाटील हा दिल्लीत उतरला आहे तर वैष्णवी व यशराज हे पुण्यात विमानाने उतरले आहेत. पाल्याचा फोन आल्यानंतर सुखरूप परतल्याने पालकानी  सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.