जतेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ आंदोलन | प्रांताधिकारी कार्यालयासमोर केला निषेध

0
जत,संकेत टाइम्स : औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. तसेच पुणे येथे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याविषयी चुकीचे विधान केले आहे. या विधानाच्या निषेधार्थ जत तालुका बहुजन समाजाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात युवक नेते विक्रम ढोणे, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष श्रेयस नाईक ,ओबीसी नेते तुकाराम माळी,  नगरसेवक भूपेंद्र कांबळे,जक्काप्पा सर्जे, निवृत्ती शिंदे , माजी सभापती बाबासाहेब कोडग,अण्णा भिसे,सद्दाम अत्तार,संतोष मोटे, गिरीष बुव्वा,हेमंत चौगुले,हेमंत खाडे,गौतम एवाळे,नगरसेवक प्रकाश माने,मिथुन भिसे, भूपेंद्र बाबासाहेब कांबळे,बाळू तंगडी, शहाजी वाघमोडे, आदी उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांनी केलेले विधाने मागे घ्यावेत त्यांनी केलेल्या विधानामुळे शिवप्रेमी व बहुजन समाज यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे राज्यपालांचा निषेध केला. राज्यपाल यांनी केलेली चुकीची विधाने त्वरित मागे घ्यावे आणि  अशी मागणी केली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.