छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परवानगी प्रक्रिया अतिंम टप्यात ; प्रकाश जमदाडे,उमेश सांवत यांची माहिती | लवकरचं मूर्ती प्रतिष्ठापना होणार

0
जत : जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे नाहरकत दाखल्यांची पुर्तता अंतीम टप्प्यात आली असून लवकरच महाराजांची अश्वारूढ पुर्णाकृती मूर्ती नियोजीत ठिकाणी बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक श्री.प्रकाश जमदाडे व माजी उपनगराध्यक्ष श्री.उमेश सावंत यांनी दिली.
जमदाडे,सांवत म्हणाले,जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यात येणा-या पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती प्रतिष्ठापना संदर्भात सांगली चे जिल्हाधिकारी श्री. अभिजित चौधरी यानी नियमावर बोट ठेवल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती जत शहरात आणण्यात येऊनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी बसविण्यात न आल्याने समस्त शिवप्रेमी नाराज झाले होते.

 

 

त्यातच जत शहरासह तालुक्यातील परिस्थिती चांगल्या प्रकारे असतानाही जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपूर्वीच जत शहरात जमावबंदीचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे तर पोलीस प्रशासनाने काहीही दंगा,धोपा, तणाव नसताना जत शहरात दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या व दिड हजार पोलीसांना बंदोबस्तासाठी बोलावले होते. त्यामुळे जत तालुक्याची सर्वत्र मोठी बदनामी झाली होती.

 

जमदाडे सांवत म्हणाले, आमचे नेते माजी आमदार व छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष श्री. विलासराव जगताप यानी परवानग्या घेऊनच छत्रपतींची मूर्ती बसवू असा निर्धार केल्याने व जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील यांनीही जिल्हाधिकारी श्री.अभिजित चौधरी यांना जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात जे काही दाखले लागतील ते जिल्हास्तरावर समितीला उपलब्ध करून देण्याचे आदेश बैठकीत दिल्याने व त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत ३१ नाहरकत दाखल्यांची पुर्तता केली असून अजून दोन दाखल्यांची पुर्तता होऊन तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या चबुत-यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती बसणार आहे असेही जमदाडे व सावंत यांनी सांगितले.
सर्व पक्षीय बैठकीनंतर कार्यक्रमाचे नियोजन
छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती बसविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर लवकरच आम्ही एक सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचेही जमदाडे व सावंत यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.