अक्कलकोट- गाणगापूर रोडवर भरधाव कार झाडावर आदळुन झालेल्या अपघातात 5 ठार

0
Rate Card
सोलापूर : अक्कलकोट- गाणगापूर रोडवर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ भरधाव कार झाडावर आदळुन झालेल्या अपघातात कारमधील चार महिला आणि चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. दोन जण गंभीर जख्मी झाले. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, पाचही जण जागेवरच ठार झाले. याची अफझलपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर,  राणी बाबासाहेब वीर,  अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिली बाबासाहेब वीर,त्राली दिनकरा सुरवशी गंभीर जखमी  झाले.

कारमधील सर्वजण मृत्युमुखी पडल्याने  व दोन जण वाचलेले गंभीर जखमी असल्याने अहमदनगरवरून नातेवाईक निघाले आहेत, ते आल्यावरच रात्री उशिरा फिर्याद दाखल होईल अशी माहिती अफझलपूरचे पीएसआय विश्वनाथ मुदरेड्डी यांनी दिली. सर्व प्रवाशी अहमदनगरचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.