संखला १९ दिवसांचा यात्रा महोत्सव सुरू

0
संख,संकेत टाइम्स : येथे श्री गुरु बसव विरक्त मठ येथे श्री शिवलिंगेश्वर मूर्ती प्रतिष्ठान व अक्कमहादेवी यांच्या मूर्ती प्रतिष्ठानेनिमित्त १९ दिवसांचा यात्रा महोत्सव सुरू झाला. तो २२ मार्चपर्यंत चालेल. ‘अक्कमहादेवी यांचे जीवन दर्शन अध्यात्म’ विषयावर रोज सायंकाळी ७ वाजता प्रवचन, त्यानंतर महाप्रसाद आयोजित केला आहे.
प्रवचनकार विवेकानंद स्वामी – गुणदाळकर व बसव विरक्त मठाचे मठाधिपती महेश देवरु यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम सुरू
आहेत.

 

नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.महिला दिनानिमित्त श्री गुरु बसव विरक्त मठापासून पदयात्रा काढण्यात आली. प्रत्येक घराच्या अंगणात रांगोळी काढण्यात आली होती. महिलांचा मोठा सहभाग होता. जनजागृतीसाठी पहाटे दिंडीचा उपक्रम राबवला जात आहे. मंगळवारी (ता.२२) श्री पूज्य शिवलिंगेश्वर स्वामी व श्री पूज्य वैराग्यनिदी अक्कमहादेवी यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे.
Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.