प्रयत्न करत राहा

0
2
जीवनात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर इतरांसाठी मार्गदर्शक ठराल.  स्वामी विवेकानंदांच्या या ओळींमध्ये जीवन-संघर्षाचे मर्म दडलेले आहे.  समाजात अशी अनेक माणसे आहेत, जी मोठी स्वप्ने घेऊन चालतात, पण एक-दोनदा अपयशी ठरल्यावर मधेच प्रयत्न सोडून देतात आणि मागे पडतात.  अशांना फार कमी कळलेलं असतं की ते यशाच्या अगदी जवळ आलेले असतात, कारण प्रत्येक प्रयत्नात एखादी व्यक्ती पूर्वीपेक्षा चांगली अनुभवी बनलेली असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही ना काही अनुभव समाविष्ट झालेला असतो. त्याचा उपयोग त्या व्यक्तीला पुढच्या प्रयत्नात नक्की होतो.

 

 

एखादी व्यक्ती पहिल्यांदाच नवीन ठिकाणी गेली तर तिला तिथे जाण्याचा मार्ग माहीत नसल्यामुळे वाटेत बराच वेळ वाया गेलेला असतो.  आणि जेव्हा तो पुन्हा त्याच ठिकाणी जातो तेव्हा त्याला त्या मार्गाचे ज्ञान झालेले असते आणि येणाऱ्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा अनुभव देखील त्याला मिळालेला असतो. त्यामुळे ते ठिकाण त्यांना लवकर गाठता येतं. म्हणजे जेव्हा माणूस प्रयत्न करतो तेव्हा त्याला आयुष्यात असे अनेक अनुभव येतात, जे कधीच व्यर्थ जात नाहीत.  समस्यांचे निराकरण करण्याचा गुण जन्मापासूनच माणसाच्या अंगी असतो, परंतु स्वतःच्या निर्णयातून, जीवनात घेतलेल्या कृतींमधून, मिळालेल्या अनुभवांमधून तो गुण अधिक उपयोगाचा ठरतो.

 

अनेक अपयशानंतर थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लावला हे प्रसिद्ध आहे.  त्यांना प्रत्येक प्रयत्नात काही ना काही नवीन शिकायला मिळाले आणि पुढच्या प्रयत्नात त्यांनी त्याचा समावेश केला.  मग ते म्हणाले, ‘मी कधीच अपयशी झालो नाही, मी दहा हजार मार्ग शोधले,एवढंच की जे माझ्यासाठी कामी आले नाहीत.’

 

– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here