बुलेटला धडक पती-पत्नी गंभीर | कार चालकाने बालकाला महामार्गावरुन सहा किलोमीटर फरफटत नेले

0
जत,संकेत टाइम्स : विजापूर -गुहागर महामार्गावर भरधाव मोटारीने धावडवाडी (ता. जत) नजिक दुचाकी स्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुर्देव्याने दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला,तर दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.भिषण अपघातानंतर चारचाकी माेटारचालकाने माेटारीच्या बंपरवर अडकलेल्या बालकाला महामार्गावरून तब्बल सहा किलाेमीटर फरफटत नेल्याचा कार चालकाचा निर्दयीपणा,  प्रकार समोर आला आहे.
अब्दुलसमद साजिद शेख (रा.धावडवाडी)असे मृत बालकाचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला आहे. याप्रकरणी माेटारचालक महादेव मधुकर कुंडले (३०, रा. जालिहाळ बु., ता. जत) याला कवठेमहांकाळ पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विजापूर – गुहागर या राष्ट्रीय मार्गावर धावडवाडी गाव आहे. येथील साजिद लालखान शेख व त्यांची पत्नी जबिन साजिद शेख हे मुलगा अब्दुलसमद याला घेऊन दुचाकीने (क्र. एमएच १० ३४९८) मळ्याकडे निघाले हाेते. यावेळी मागून येणाऱ्या माेटारीने (क्र. एमएच १२ एचएन १६७४) जांभूळवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस जाेरदार धडक दिली. अपघातात साजिद शेख जोराने उडून रस्त्यावर काेसळले, तर त्यांची पत्नी व मुलगा माेटारीच्या बंपरमध्ये अडकून सुमारे तीनशे मीटरपर्यंत फरफटत गेले. जबिन या रस्त्यावर पडल्या. पण दाेन वर्षाचा अब्दुलसमद माेटारीच्या बंपरमध्येच अडकून राहिला.अब्दुलसमदला अडकलेल्या स्थितीत चालकाने माेटर न थांबविता भरधाव वेगाने पलायन केले.

 

घटना स्थळापासून पुढे महामार्गावरील चोरीची येथील बसस्थानकासमाेरील काही लोकांना हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी त्यास राेखण्याचा प्रयत्न केला. तरीही चालकाने माेटार वेगाने पळवली.संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान,पुढे काही अंतरावर चालकाने रस्त्याकडेला माेटार थांबवून बालकास बाजूला काढून टाकत माेटार पुन्हा पुढे पळवली. नागज फाट्यावर जमावाने त्याला राेखले व बेदम चोप दिला. त्यापाठोपाठ धावडवाडी येथील शेख यांचे नातेवाईकही पाेहाेचले. त्यांनी अब्दुलसमदला ढालगाव येथील रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. जत येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून अब्दुलसमदचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, धावडवाडी येथे रस्त्यावर पडलेल्या साजिद शेख व जबिन शेख या पती-पत्नीस नागरिकांनी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. अपघातग्रस्त माेटारीचा चालक महादेव कुंडले यास माेटारीसह कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास जत,कवटेमहाकांळ पोलीस करत आहेत.
मात्र दोन वर्षाच्या बालकांच्या अशा मुत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.