गावागावातील सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांच्या रिझर्व्ह बँकच  

0

 

आमदार विलासराव जगताप ; वज्रवाड सोसायटी इमारत बांधकामाचे भूमिपुजन

बिळूर,संंकेत टाइम्स : सहकार पंढरी अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात सहकाराचे भक्कम जाळे निर्माण करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.गावागावांत असणाऱ्या सेवा सोसायट्यांना फार महत्व आहे.या सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकच आहेत.या सोसायट्या अधिक सक्षम केल्या तर शेतकऱ्यांची व गावाचीही प्रगती होणार आहे,असे प्रतिपादन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.

Rate Card

 

वज्रवाड सोसायटीचे नविन इमारत बांधकामाचे भूमीपूजन समारंभ माजी आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते व जिल्हा बँकेचे संचालक श्र प्रकाशराव जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब,बिळूरचे पं.स.सदस्य रामण्णा जीवनावर,उमराणीचे अप्पासाहेब नामद,सिंदुरचे सरपंच गंगाप्पा हारूगेरी,बसर्गीचे शिवाप्पा तांवशी,एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील,गुगवाडचे रायाप्पा अंदानी,तसेच बिळूर जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व मान्यवर,वज्रवाड सोसायटीचे चेअरमन चिदानंद चौगुले,व्हा.चेअरमन शिवगोंडा हळ्याळ व संचालक मंडळ तसेच वज्रवाडचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

जगताप म्हणाले,सध्या या सोसायट्या केवळ पिककर्ज, दिर्घ व मध्यम मुदत कर्जे अशी जुजबी सेवा देतात. अपवादात्मक सोसायट्यांचे खतविक्री, रेशनिंग दुकान, पेट्रोल पंप, असे इतरही व्यवसाय आहेत. मात्र सर्वच सोसायट्यांचे अशा माध्यमातील उत्पन्न वाढले पाहिजे.

 

प्रकाश जमदाडे म्हणाले,जिल्हा बँकेत यापुर्वी असणारे किचकट प्रथा आम्ही बाजूला करून व्यवस्थित कर्ज भरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरू केला आहे.गावागावातील शेतकऱ्यांना कर्ज देऊन सक्षम करण्याचे काम सोसायट्या करू शकतात.तालुक्यात अनेक सोसायट्या कर्ज वाटप,वसूली,व आदर्श व्यवस्थापनामुळे आदर्श ठरत आहेत.हक्काच्या इमारती,विविध व्यवसाय  याशिवाय अनेक नवे उपक्रम सोसायट्यांच्या माध्यमातून राबवण्याचा मानस असल्याचेही जमदाडे म्हणाले.
वज्रवाड सोसायटी इमारत बांधकामाचे भूमिपुजन करताना माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे,मन्सूर खतीब आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.