मच्छिंद्र ऐनापुरे यांना जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार प्रदान

0

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील एकुंडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक मच्छिंद्र ऐनापुरे यांचा सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.

 

श्री. ऐनापुरे यांना 2021-22 सालातील सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील, सभापती प्रमोद शेंडगे, समाज कल्याण सभापती श्री. कनुजे, संजय पाटील, मंगल नामद, मनीषा पाटील,भगवान वाघमारे आदी उपस्थित होते.

 

श्री.ऐनापुरे जत तालुक्यातील एकुंडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी सातत्याने मुलांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.विशेषतः मुलांचे अक्षर लेखन सुधार प्रकल्प, पुस्तक वाचन आदींवर भर दिला आहे.

Rate Card

 

श्री. ऐनापुरे स्वतः लेखक असून त्यांचे बालकथासंग्रह, व्यक्तिचित्रे यांसह आठ पुस्तके प्रकाशित आहेत.इयत्ता आठवीच्या बालभारती पुस्तकात ‘धाडसी कॅप्टन राधिका मेनन’ हे त्यांनी लिहिलेले व्यक्तिचित्र समाविष्ट आहे. त्यांचे ब्लॉगलेखनदेखील प्रसिद्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.