महिला काँग्रेसतर्फे जतमध्ये डिजीटल सभासद नोंदणी

0

 

 

 

सांगली :  महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांचे आदेशानुसार सांगली जिल्हयामध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांची डिजीटल सभासद नोंदणी चालू आहे. नुकताच त्यांनी जत तालुक्यामध्ये महिला काँग्रेसच्या वतीने पंचायत समितीच्या प्रत्येक गणामध्ये एक महिला समन्वयकाची नोंदणी केली. बनाळी, शेगांव, डफळापूर, रावळगुंडवाडी, बिळूर, जत, माडग्याळ, उटगी, उमदी, माणिकनाळ, तिकोंडी, दरीबडची, आसंगी (जत) गुड्डापूर येथील गावांचा दौरा करून पंचायत समिती गणाला एक याप्रमाणे महिला समन्वयकाची नोंदणी करण्यात आली.

Rate Card

 

यावेळी जत तालुका महिला काँग्रेस नादिरा शेख, सुजाता माळी, अर्चना कबाडे,  सुजय (नाना )शिंदे, रवी सावंत, दिग्विजय चव्हाण, श्रीशैल पाटील भिमराया बिरादार, वहाब मुल्ला, इरगोंडा लोहगाव, लक्ष्मण कोरे, रमेश हळके, संतोष आरकेरी, श्रीशैल बगली, रायगोंडा राचगोंडा,बसू पाटील, रमेश मासाळ,अमोघसिद्ध शेंडगे, सुरेश यळदरी, मौला मणेर, गुरुबाळ हिरेमठ, गणी मुल्ला तसेच या गावातील प्रमुख नेते मान्यवर उपस्थित होते.

 

 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.