पाश्चात्य देशाप्रमाणे आपला देशही प्रगती करेल ; ना.जयंत पाटील

यावेळी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,जिल्ह्यातील दुष्काळी भागात हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. हल्ली उत्तरेकडे इतके चांगले रस्ते झाले आहेत की पर्यटनासाठी हिमाचल आणि इतर ठिकाणी जाणाऱ्यांना आता अडचणी येत नाहीत.
पाश्चात्य देशांची प्रगती तिथल्या रस्त्यांमुळे झाली. मला विश्वास आहे, की आपला देशही त्याप्रमाणे प्रगती करेल. आमच्या जिल्ह्यातील पेठ नाक्यावरून सांगलीला जाणारा रस्ता, कोल्हापूरला जाणारा रस्ता व्हावा हा आमचा मानस आहे. याचे काम अद्याप झालेले नाही. आम्हाला खात्री आहे की गडकरी साहेब हे कामही लवकरात लवकर पूर्ण करतील.

कोल्हापूरला विमानतळ झाले मात्र सांगलीत झालेले नाही. आमच्या सांगली जिल्ह्याला ड्राय पोर्ट व्हावा यासाठी गडकरीजी आपण आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. यामुळे आमच्या जिल्ह्याचाही मोठ्या प्रमाणात विकास होईल,असे यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले.