कै. शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शल्यचिकित्सा विभाग सुरू

0
जत,संकेत टाइम्स : जत येथील प्रसिद्ध डॉक्टर रविंद्र आरळी यांच्या कै. शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शल्यचिकित्सा विभाग सुरू करण्यात आला आहे.
शल्यचिकित्सा विभाग अर्थात सर्जरी विभागाचे उदघाटन बिळूरचे मठाधिपती मुरगेंद्र महास्वामी, बबलादी मठाचे मठाधिपती अप्पय्या महारुद्रय्या हिरेमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. रविंद्र आरळी, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, डॉ. शरद पवार, डॉ. अक्षय कायापुरे, डॉ. शिल्पा कायापुरे आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ. आरळी म्हणाले की, डॉ. अक्षय कायपुरे हे तज्ञ शल्यचिकित्सक आहेत. जत येथे हा विभाग सुरू केल्याने ऑपरेशनसाठी सांगली व अन्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. आरळी हॉस्पिटलमध्ये जतकरांना सर्व सुविधा देण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.