जाडरबोबलाद हल्ला प्रकरण,5 जणावर गुन्हा दाखल

0
Post Views : 413 views
जतः लवंगी (ता. मंगळवेढा) येथे तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. यात जाडरबोबलाद तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी जाडरबोवलाद येथील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दयानंद मल्लेशप्पा बरुर यांनी मंगळवेढा
पोलिसात फिर्याद दिली आहे.

 

रेवणसिद्ध आप्पाराया बरुर,आप्पाराया मोरत्याआप्पा बरुर, सिद्धराया जक्कांना बरूर व अन्य दोघावर (सर्व रा. जाडरबोबलाद) अशी संशयिताची नावे आहेत.

 

याबाबत माहिती अशी, जखमी दयानंद बरुर व संशयित रेवणसिद्ध बुरूर यांचे जाडरवोबलाद शेत जमीन आहे एक महिन्यापूर्वी रेवणसिद्ध याने शेताच्या कारणातून वाद केला होता. याच वादातून संशयितांनी रविवारी रात्री दयानंद बरूर, महादेव वरुर, विठ्ठल बरूर, हे नंदूरहून एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाऊन घराकडे परतत असताना लवंगी येथे तलवारीने हल्ला चढवला.

 

यात एकाचा हात तोडला आहे. दुसरे दोघे
गंभीर जखमी झाले.तिघांवर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे करत आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.