तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी कामी यावे ; प्राचार्य डॉ.संजीव दळवाई
करजगी,कल्लाण्णा बालगाव
माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते,असे प्रतिपादन डॉ.आर.के.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजीव दळवाई यांनी केले.

या कार्यक्रमा प्रसंगी श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष किरण आर पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सरपंच मदगोंडा सुसलाद, उपसरपंच बसगोंडा चौगुले, भिवर्गी हायस्कूलचे चेरमन राजेंद्र बिरादार,बिळेनी बिरादार श्रीशैल चौगुले, मदगोंडा बिरादार, पंडित पाटील, आमसिद्द बिरादार, भारत करे, श्रीकांत बिरादार, मम्मासाब सनदी, अशोक वाघोली, प्रशांत बाजबलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनांचे शिबिर खास करून भिवर्गी गावचे ग्रामदैवत बिलेनिसिद्ध देवस्थान मंदिर स्वच्छ सुंदर बनवले, गावातील सर्व गल्ली,गटारे स्वच्छ केले. शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.सूत्रसंचालन व आभार प्रा इंगळे सर यांनी मानले.यावेळी प्रा.इटेकर सर, वठारे सर, व संस्थेचे सचिव अजय बिरादार सर हे उपस्थित होते.
भिवर्गी :संख येथील डॉ. आर के पाटील महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप संपन्न झाला.
