भिवर्गीत एकाला मारहाण

0
जत,संकेत टाइम्स : भिवर्गी (ता. जत) येथे ‘तू माझ्या शेतातून जायचे नाही’, असे म्हणत एकाला लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली. रेवणसिद्ध आण्णाप्पा बिरादार असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी रेवणसिद्ध मादापा बिरादार, ओगाप्पा रेवणसिद्ध बिरादार, सोमनिंग रेवणसिद्ध बिरादार,शशिकुमार गौडगावी, सिलसिद्ध रामगोंडा बिरादार, आमसिद्ध मादाप्पा बिरादार यांच्यावर उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत रेवणसिद्ध यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भिवर्गी येथे रेवणसिद्ध बिरादार यांची शेती आहे. ते शेतातून जात असताना संशयितांनी त्यांच्या पायावर लोखंडी रॉडने मारून जखमी केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.