तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्हासाठी २ कोटी ९४ लाख निधी मंजुर ; मंत्री विश्वजीत कदम | जतला 98 लाख

0
सांगली : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांकरिता जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या तांडा वस्ती मध्ये विविध विकासकामांसाठी रू २ कोटी ९४ लाख रुपये एवढ्या निधीला मान्यता देण्यात आली असून त्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगांव, पलुस, आणि जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भटक्या जाती जमातीची लोकसंख्या असुन या समाजाचे जिवनमान उंचावण्यासाठी   विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या निधीच्या माध्यमातून  सदर प्रवर्गातील समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना गती मिळाणार असल्याची माहिती डॉ कदम यांनी दिली.

 

 

सांगली जिल्ह्यातील  कडेगांव, पलुस, आणि जत व इतर तालुक्यातील जवळपास २३ विविध विकासकांना गती मिळणार आहे.सदर प्रलंबित विकास कामाबाबत राज्यांचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री.विजय वडेट्टीवार यांच्या कडे सातंत्य पुर्ण पाठपुरावा करून सदर प्रलंबित कामांबाबत डॉ. विश्वजीत कदम यांनी आग्रह केला होता त्यांस मान्यता प्रधान करण्यात आली असून सदर विकास कामांमध्ये पलुस मधील गणेश नगर येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम साठी १० लाख, तांडा वस्ती येथे सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी ६ लाख,रामोशी वस्ती इंगळेनगर सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे साठी १० लाख, घोघाव धनगर वस्ती आर सी सी गटार बांधकाम करणेसाठी १० लाख,तुपारी येथील रामोशी वस्तीमध्ये गटार व रस्ता काँक्रीटीकरणासाठी १० लाख,
कडेगांव तालुक्यातील वांगी येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकामसाठी १० लाख, वडीयेरायाबाग – नदिवाले वस्ती व अहिल्यानगर रस्ता काँक्रीटीकरणासाठी व आर सी सी गटार बांधकाम करणे साठी ८ लाख ९५ हजार ,सोहोली ,बेलदार वस्ती मध्ये आर सी सी गटार व पेव्हर ब्लॉक बांधकाम करणे साठी १० लाख रुपये,सोहोली नंदीवाले वस्ती  पेव्हींग ब्लॉक साठी १० लाख, रामपुर येथील उमाजी नाईक वस्ती मध्ये रस्ता व गटार काँक्रीटीकरण साठी ७ लाख ९९ हजार रुपये, पाडळी, येथील बिरोबा वस्ती थळ वस्ती मध्ये आर सी सी गटार व पेव्हींग ब्लॉक बसविणे साठी १० लाख,

 

 

जत तालुक्यातील,लगाणतांडा द.ब चाखा खुशाबा नाईक वस्ती रस्ता काँक्रीटीकरण साठी ६ लाख, लमाण तांडा राठोड वस्ती पेव्हिंग ब्लॉग बसविणे साठी ५ लाख रुपये, निगडी बु, लमाण तांडा, अंतर्गत रस्ता व पेव्हीग ब्लॉक बसविणे साठी १० लाख,उमदी , मार्तंड तांडा पाणी पुरवठा करणे साठी १० लाख, उमदी झुलेनगर समाज मंदिर बांधणेसाठी ७ लाख , उमदी लोखंडे नगर रस्ता काँक्रीटीकरण साठी १० लाख,लमाणतांडा उटगी चंदू वस्ती बोअरवेल मारणे ३ लाख, तांडा गावठाण अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण साठी १० लाख,कागनरी लमानणतांडा पेव्हिग ब्लॉक बसविणे १० लाख कागनरी लमाण तांडा कानगरी येथील हमुलाल मंदिर परिसरात सभामंडप बांधनेसाठी ७ लाख, धुळकरवाडी सेवालाल नागर रस्ता काँक्रीटीकरण, सभामंडप, शाळा संरक्षक भिंत बांधकामासाठी १० लाख,धुळकरवाडी करेवाडी वस्ती रस्ता काँक्रीटीकरण सभामंडप बांधकाम, तांडा विद्युतीकरण करणे १० लाख. याप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.