ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दाखवलेल्या विश्वासामुळेच उच्चांकी गाळप ; आ.विनय कोरे

0
कुरळप, संकेत टाइम्स : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दाखवलेल्या विश्वासामुळेच तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या उच्चांकी गाळप क्षमते चे उद्दिष्ट पूर्ण झाले,असल्याची मत वारणा उद्योग समूहाचे नेते व कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमदार डॉ.विनय रावजी कोरे यांनी व्यक्त केले.ऐतवडे खुर्द ता वाळवा येथील वारणा शिक्षण संकुलाच्या प्रांगणात तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा व सभासद सहस्नेहमेळावा आयोजित केला होता त्याप्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक सभासदांना मार्गदर्शन करताना डॉ विनय कोरे बोलत होते.
आ.विनय कोरे पुढे म्हणाले कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे  अडचणीत सापडलेला वारणा उद्योग समूहाला  पुन्हा उभारी मिळाली आहे हा उद्योग समूह आर्थिक मदतीसाठी यापुढे कोणाकडे ही आर्थिक मदत मागणार नाही लवकरच ऋणमुक्त होऊन हा उद्योग समूह आर्थिक सक्षम बनेल.चालू गळीत हंगामामध्ये असणाऱ्या  कमी क्षमता असणाऱ्या इंडियन ऑइल प्रकल्पामध्ये प्रतिदिनी एक लाख एक हजार लिटरच्या एक हजार लिटरचे महाराष्ट्रात उच्चांकी उत्पादन घेतले आहे त्यातून  वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रकल्पातून सात कोटी युनिटस टप्पा पार करणारा  वारणा साखर कारखाना महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे.
                या कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित संचालकांचा ऐतवडे खुर्द येथील विविध सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी स्वागत प्रास्ताविक करताना डॉ.प्रताप पाटील म्हणाले,वारणेच्या खोऱ्यात गेल्या साठ वर्षापासून सरकार आणि शिक्षणाची उभारणी करताना तीन पिढ्यांची तपश्चर्या राहिले आहे स्वर्गीय तात्यासाहेब कोरे साहित्यप्राज्ञ स्व. बाजीराव पाटील यांच्यानंतर नवीन सुसंस्कृत पिढी निर्माण होऊ लागली आहे विकासाची हीच परंपरा अखंडपणे तात्यासाहेबांची दुसरी पिढी स्व विलास दादा  त्यानंतर तिसरी पिढी निपूनजी कोरे व विनयजी कोरे यांच्या माध्यमातून वारणेच्या विकासात उतरले डॉ.विनयजी कोरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे सुरू असल्याचे मत डॉ पाटील यांनी व्यक्त केले.
             कार्यक्रमासाठी ऐतवडे खुर्द परिसरातील  हजारो ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते यावेळी डॉ सुरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले प्रास्ताविक सौ सुवर्णा आवटे यांनी तर आभार आप्पासो खराडे यांनी  केले
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.