भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली शहर येथील पुतळ्यास महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
सांगली : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली बस्थ स्थानक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सांगली बस्थ स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त खुशाल गायकवाड, समितीचे सदस्य सचिव संभाजी पोवार, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, नगरसेविका स्नेहल सावंत, समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
