जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याला शुक्रवारी सायकांळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. काही भागात सौम्य गारपिठही झाली आहे.दरम्यान वादळी वाऱ्यामुळे आंबा,द्राक्ष,बेदाण्यासह भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्या मोठा फटका जत शहरात आलेल्या सर्कसीला बसला आहे.सर्कसीमध्ये वारे घुसल्याने तंबूचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून तीव्र उन्हाच्या झळा,उकाडा जाणवत होता.शुक्रवारी सकाळपासून तीव्रता वाढली होती. सायकांळी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे,गारपीठ व पावस आला.वाऱ्याचा जोर असल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जत शहरासह तालुक्यातील जवळपास सर्व गावांना या वादळी पावसाचा फटका बसला आहे.शेवटीची द्राक्ष, बेदाणा व भाजीपाला पिकाला फटका बसला आहे.सर्वाधिक आंबा पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

अनेक गावात वादळी वाऱ्यामुळे घरे,शाळा,गाईच्या गोठ्याची छते उडाल्याचे वृत्त आहे.पावसाने काही गावात समतल भागात पाणी साचले होते.तर उन्हाने त्रस्त नागरिकांना गारव्याने दिलासा दिला आहे.