करजगी जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या २ खोल्या धोकादायक

0
6
करजगी,संकेत टाइम्स : येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या ४ खोल्या धोकादायक स्थितीत आहे.त्या तातडीने पाडून नव्या खोल्या बांधाव्यात अशी मागणी पालकांतून होत आहे.
करजगी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे १ ते ७ पर्यंतचे वर्ग आहेत.यात सुमारे २०० हून जादा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
त्याशिवाय या विद्यार्थ्यांना शिक्षकही ज्ञानार्जनाचे काम करतात.या शाळेला २ स्लँबच्या तर दोन कौलारू  जून्या खोल्या आहेत.जून्या खोल्या धोकादायक व जीर्ण बनल्या आहेत.याबाबत पालकांनी संबधित विभागाला कळविले आहे.सध्या या धोकादायक खोल्यात विद्यार्थी न बसविता झाडाखाली विद्यार्थी बसविले जात आहेत.जिल्हा परिषद,जत पंचायत समितीने तातडीने दखल घेऊन नव्या खोल्या बांधाव्यात अशी मागणी पालकांतून होत आहे.
करजगी ता.जत येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या धोकादायक खोल्या
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here