करजगी,संकेत टाइम्स : येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या ४ खोल्या धोकादायक स्थितीत आहे.त्या तातडीने पाडून नव्या खोल्या बांधाव्यात अशी मागणी पालकांतून होत आहे.
करजगी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे १ ते ७ पर्यंतचे वर्ग आहेत.यात सुमारे २०० हून जादा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
त्याशिवाय या विद्यार्थ्यांना शिक्षकही ज्ञानार्जनाचे काम करतात.या शाळेला २ स्लँबच्या तर दोन कौलारू जून्या खोल्या आहेत.जून्या खोल्या धोकादायक व जीर्ण बनल्या आहेत.याबाबत पालकांनी संबधित विभागाला कळविले आहे.सध्या या धोकादायक खोल्यात विद्यार्थी न बसविता झाडाखाली विद्यार्थी बसविले जात आहेत.जिल्हा परिषद,जत पंचायत समितीने तातडीने दखल घेऊन नव्या खोल्या बांधाव्यात अशी मागणी पालकांतून होत आहे.
करजगी ता.जत येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या धोकादायक खोल्या