लोकअदालतीत ३६ प्रकरणे निकाली

0
जत,संकेत टाइम्स :  महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, जत तालुका विधी सेवा समिती, बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित दाव्यातून १४ लाख १७हजार ४५५ रुपये इतक्या रकमेची वसुली झाली आहे.
दिवाणी न्यायालय (कनिष्ठस्तर) न्यायाधीश ई. के. चौगुले, सहाय्यक दिवाणी न्यायाधीश ए. बी. जाधव यांनी लोकअदालतीचे कामकाज पाहिले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. आर. के.१४ लाखांची वसुली मुंडेचा, उपाध्यक्ष राजकुमार म्हमाणे,सचिव एस. ए. कुंभार, ॲड. सागर व्हनमाने, एच. सी. विराजदार, सी. एस.मठपती उपस्थित होते.
या अदालतीमध्ये १ हजार ८९० दावापूर्व प्रकरणे, ७५३ न्यायालय दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी ७ दावा पूर्व प्रकरणे व २९ दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढली.असे एकूण ३६ प्रकरणे समोपचाराने निकाली काढण्यात आली. तसेच या लोकअदालीत दावा पूर्ण प्रलंबित प्रकरणांमध्ये १४ लाख १७ हजार ४५५ इतक्या रकमेची वसुली झाली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.