जत तालुक्यातील ९ बिनविरोध | १३ सर्व सेवा सोसायट्यासाठी रणधुमाळी सुरू

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील ९ सर्व सेवा
सोसायट्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तेरा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती होणार
आहे.
एप्रिल व मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत निगडी खुर्द, बागेवाडी, लोहगाव, देवनाळ, एकुंडी, धुळकरवाडी, जालीहाळ खुर्द, सनमडी, कंठी या सोसायट्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे.स्थानिक गटातटातील राजकारणाला बगल देऊन सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन या गावातील निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. तसेच येळवी सर्व सेवा सोसायटीत चार
जागा बिनविरोध झाल्या.
उर्वरित नऊ जागेसाठी निवडणूक झाली. यात जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व सोसायटीचे माजी अध्यक्ष पंचाक्षरी अंकलगी या दोन्ही गटांनी एकत्र येऊन एकतर्फी विजय मिळवला आहे.सद्यस्थिती बेवणूर, जाडरबोबलाद, दरीबडची, वळसंग,शिंगणापूर, बेंळुखी, हळ्ळी, सुसलाद,तिकोंडी, डफळापूर, कुंभारी, बिळूर,तिकोंडी या ठिकाणीच्या सोसायटीच्या लढती प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.