जत येथील यशवंतराव चव्हाण सहकारी पतसंस्थेला बँको ब्ल्यू रेबिन पुरस्काराने सन्मानित 

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील नामांकित  तसेच माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली यशवंतराव चव्हाण सहकारी पतसंस्थेला बँको ब्ल्यू रेबिन पुरस्काराने कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात सन्मानित  करण्यात आले.या पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज जगताप आहेत तर सचिव संजय गावडे असून या मानाच्या पुरस्काराने पतसंस्थेची मान उंचावली आहे.या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माजी आमदार विलासराव जगताप यांच्या संकल्पनेतून  2001 मध्ये स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण या पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असाच असल्याने 21 वर्षात  संस्था नावारूपाला आली आहे. संस्थेच्या या यशस्वी घोडदौडीत संस्थेचे चेअरमन मनोज जगताप,सचिव संजय गावडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच विजय खांडेकर, मयूर पांढरे,सचिन कोळी,महेश कुकडे,प्रकाश सगरे,बाळासाहेब माने आदींचा समावेश आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन मनोज जगताप म्हणाले की,सहकारी संस्था कार्यक्षम चालवून त्या टिकवणे हे कठीण काम आहे. संस्थेचे कर्मचारी,संचालक,सभासद यांच्या सहकार्याने व परिश्रमामुळे संस्था नावारूपाला आली आहे.यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे.यापुढेही संस्थेचा कारभार अधिक गतीने करू.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.