भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची नाव न घेता तोफ धडाडली 

0
मुंबई : ”जो एक खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्या सोबत होता, ते देशाची भरकवट आहेत. मला आज मोठी गदा देण्यात आली. मी मध्ये बोलो होतो. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे”, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईतल्या बीकेसी मैदानावर पार पडलेल्या सभेत ते असं म्हणाले आहेत. या सभेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले आहरेत की, ”आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. बाकीच्यांच्या हिंदुत्व घंटाधारी आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचा हिंदुत्व ‘गधा’धारी आहे. म्हंटल बरोबर आहे. आमचं हिंदुत्व ‘गधा’धारी होत, म्हणून आम्ही अडीज वर्षांपूर्वी तुम्हाला सोडलं. आमचे जुने फोटो तुमच्यासोबत येतात, त्यावरून तुमचा गैसमज झाला असेल. मात्र आम्ही गध्याला सोडलं आहे.” भाजपला टोला लगावत ते म्हणाले, ”गाढवानं लाथ मारायची आधी, आम्ही लाथ मारली आता बसा बोंबलत.”
भाजपवर हल्लाबोल करत ते म्हणाले आहेत की, ”देशात एक भ्रम निर्माण केला जात आहे आणि आवेश आणला जात आहे, देशातच नाही तर जगभरात हिंदुत्वाचे रक्षक हे भारतीय जनता पक्ष आहे. मग जे इथे बसले आहे. ते कोण आहे. हे जे हिंदू आहेत. यांच्या धमन्यांमध्ये हिंदुत्वाचा रक्त त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी परेल आहे, हा हिंदू काही मेलेल्या आईच दुध पिलेला नाही.”
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.