नियमित मान्सुन सुरू झाल्यानंतरच शेतकऱ्यांना पेरणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

0
12

सांगली : सध्या जिल्ह्यात पडत असलेला पाऊस हा मान्सुन पुर्व पाऊस आहे. नियमित मान्सुनचे आगमन सांगली जिल्ह्यात 5 ते 10 जूनच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पुरेशी ओल व नियमित मान्सुन सुरू झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

दिनांक 19 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात काल सरासरी 52.8 मिली मिटर पाऊस झाला आहे. जत तालुक्यातील डफळापूर महसूल मंडळात सर्वात जास्त 126.3 मि.मी. पाऊस झाला आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज व तासगाव तालुक्यात सर्वच महसुल मंडळात 50 मि. मी. पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. कोकरूड, ताकारी, कासेगाव महसुल मंडळात सर्वात कमी 13 ते 15 मि.मी. पाऊस पडला आहे.

एकंदरीत जिल्ह्यात मान्सुन पुर्व पावसाने जोरदार हजेरी दिलेली आहे. जिल्ह्यात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडलेली महसुल मंडळे मिरज, आरग, सांगली मालगाव, बेडग, बेळंकी, भोसे, कुपवाड, संख, माडग्याळ, जत, मुचंडी, डफळापूर, कुंभारी, शेगांव, सावळज, ढालगाव, देशिंग, कुची, कवठेमहांकाळ व हिंगणगाव ही आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here