पोहायला गेलेल्या सख्या बहीणी कृष्णेच्या पात्रात बुडाल्या | एकीचा मृत्यू, दुसरीला वाचविण्यात यश

0
Rate Card
सांगली : कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या दोघा सख्या बहिणी बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये १० वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, एका चिमुकलीला वाचवण्यात यश आले आहे. भिलवडीच्या साठेनगर येथील कृष्णा पात्राता ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिलवडी येथील साठेनगरजवळ असणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये दोघ्या सख्या बहिणी पोहायला गेल्या होत्या. या घटनेमध्ये देवयानी मल्हार मोरे ही १० वर्षीय चिमुरडी पाण्यामध्ये बुडून मृत पावली आहे. तर, चांदणी मल्हार मोरे या तिच्या बहीणीला वाचवण्यात यश आले आहे. देवयानी आणि चांदणी या दोघी बहिणी शेजारच्या मुलांच्या बरोबर पाहण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये गेल्या होत्या.

यावेळी पोहताना खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने, देवयानी आणि चांदणी बुडू लागल्या,ही बाब त्याठिकाणी धुणे धुणाऱ्या महिलेच्या निदर्शनास आली. त्या महिलेने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी या ठिकाणी असणाऱ्या एका मच्छीमाराने तातडीने धाव घेत मुलींना वाचण्यास सुरुवात केली. त्याने चांदणी मोरे हिला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत देवयानी ही खोल पाण्यात बुडाली.

दरम्यान आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत उडालेल्या चांदणीचा शोध सुरू केला. काही वेळात बेशुद्ध अवस्थेत चांदणीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच चांदणीचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी चांदणी आणि देवयानी यांचे वडील मल्हार मोरे यांचे निधन झाले आहे. पितृ छाया हरपलेल्या बहिणींपैकी एक बहीणीचा अवघ्या काही दिवसात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.