‘शिवनेरी ऍक्का’ अत्याधुनिक मिनरल वॉटर प्लांटचे बुधवारी उद्घाटन | जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांची माहिती

0

जत,संकेत टाइम्स : जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांच्या कुटुंबातील “शिवनेरी” उद्योग समूहामधिल जमदाडे ऍग्रो इंडरस्ट्रीजच्या शिवनेरी ऍक्का या अत्याधुनिक मिनरल वॉटर प्लांट चे उद्घाटन बुधवार दि. १ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्याहस्ते संपन्न होत आहे.तसेच जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसा निमित्तही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जत तालुक्यातील ताकतवान नेते जिल्हा बँकेचे संचालक असलेले प्रकाश जमदाडे यांनी तालुक्यात अनेक उद्योग उभारले आहेत.एकीकडे राजकारण,समाजकारण करत जमदाडे यांनी उभारलेले उद्योगाचे जाळे उल्लेखनीय आहेत.बुधवारी त्यांच्या जमदाडे उद्योग समुहातील मैलाचा दगड ठरणाऱ्या तालुक्यातील पहिल्या अत्याधुनिक शिवनेरी ऍक्का या अत्याधुनिक मिनरल वॉटर प्लांटचे उद्घाटन होत आहे. जमदाडे यांच्या उद्योगातील या नव्या प्लांटमुळे वेगळी ओळख निर्माण होणार एवढे निश्चित आहे.

Rate Card
दुसरीकडे तालुक्यातील अभ्यासू नेते असलेले जमदाडे यांची जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवड झाल्यापासून सोसायटी सक्षम करण्याबरोबर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करण्यात येत आहे. बँकेच्या विविध योजना अगदी थेट शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी जमदाडे प्रयत्न करत आहेत.त्याशिवाय गेल्या तीन दशकाहून जास्त काळ ते तालुक्यात ते कार्यरत आहेत.

 

सामजिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्राही त्याचे योगदान उल्लेखनीय आहे.आज तालुक्यातील लोकहिताला प्राधान्य देणारे जमदाडे यांचा बुधवार ता.१ जूनला वाढदिवस त्यानिमित्तही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला तालुक्यातील नेते,कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.