PM किसान सन्मान निधी,अकराव्या हप्त्यातील  देय लाभ लाभार्थीच्या बँक खात्यात 31 ‘मे’ ला जमा होणार

0

PM किसान सन्मान निधी,अकराव्या हप्त्यातील  देय लाभ लाभार्थीच्या बँक खात्यात आज जमा होणार

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजने अंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना अकराव्या हप्त्यातील (एप्रिल, 22 ते जुलै, 22) देय लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दिनांक 31 मे रोजी सिमला, हिमाचल प्रदेश येथून ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे. या समारंभात दिनांक 1 एप्रिल, 2022 ते दिनांक 31 जुलै, 2022 या कालावधीकरिता देय्य अकराव्या व इतर हप्त्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण 101.94 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रू. 2038.86/- कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.अशी माहिती आयुक्त कृषि तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख  पी.एम.किसान योजना महाराष्ट्र राज्य, पुणे धीरज कुमार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे 3 हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- लाभ अदा करण्यात येत आहे.

अकराव्या हप्त्याची हस्तांतरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे .

Rate Card

फेब्रुवारी, 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून दिनांक 27 मे, 2022 अखेर 109.46 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 18151.70/- कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे.

या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील 88.73 लाख लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न लाभ अदायगीसाठी नोंदणीकृत झाले आहेत. उर्वरीत सर्व लाभार्थी यांनी PM KISAN योजनेचा लाभ जमा होण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्याकरीता संबंधित बँकेत जाऊन आवश्यक अर्ज बँकेत सादर करून आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

खरीप, 2022 हंगामात विविध कृषी निविष्ठां खरेदीसाठी अकराव्या हप्त्याचा हा लाभ शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या मुळे कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.