पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जूनला कुस्त्याचे जंगी मैदान
डफळापूर,संकेत टाइम्स : पंचायत समिती सदस्य तथा तालीम संघाचे तालुका उपाध्यक्ष,कॉग्रेस नेते दिग्विजय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार ता.७ जूनला जंगी कुस्त्या,विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले मान्यवरांचे सत्कार,सह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्याशिवाय जत पश्चिम भागात नुकत्याच झालेल्या सर्व सेवा सोसायटी निवडणूकीत विजयी झालेल्या संचालक,पँनेल प्रमुखाचे सत्कारही यावेळी करण्यात येणार आहेत.जंगी कुस्त्याचा लाभ पैलवानसह कुश्ती शौकिनांनी घ्यावा असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित चव्हाण यांनी केले.
