रस्त्याच्या साईटपट्ट्या बनल्या नाले | तालुक्यातील रस्ते कामात मोठे गफले : गटारी गायब

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील रस्ते कामाचे सत्य पाऊसाने बाहेर आणले आहे.रस्ता करताना शासनाचे नियम पायदळी तुडवून केली जाणारी कामे,त्यांना असणारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या छुपा पाठिंबा यामुळे अनेक रस्ते मुत्यूचा सापळा बनत आहेत.तालुक्यातील रस्त्याच्या दुरूस्तीसाठी राज्य,केंद्र शासनाकडून जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन विभाग व पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे येतो.मंजूर कामापैंकी यावर नियत्रंण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदारांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू होतो.रस्त्याची कामे करताना कोणताही नियम पाळला जात नाही.डांबरीकरणाचे तीन तेरा वाजविले जातेच, त्याच बरोबर रस्त्याच्या मजबूतीसाठी असणाऱ्या साईट पट्ट्या एकतर काही ठेकेदाराकडून गायब केल्या जातात,किंवा नुसते मुरलाचा मुलामा देऊन काही दिवसासाठी दिसण्यायोग्य बनविल्या जातात.काही महिन्यातच त्या दबल्या जातात.त्यांतून रस्ताच्या भोवती खड्डे तयार होतात.पावसाळ्यात यांच खड्ड्यात पाणी थांबून डबकी तयार होतात.अनेक रस्त्यावर या साईटपट्ट्या वरूनच पाणी वाहत असल्याने त्याला नाल्याचे स्वरूप येत आहे. 








गटारी काढण्याचा नियम पायदळी

Rate Card


रस्ते काम करताना रस्त्यावर कोणत्याही प्रकारे पाणी थांबू नये,असा नियम आहे.त्यासाठी प्रत्येक रस्ता करताना पाणी वाहून जाण्यासाठी गटारी करण्याचे नियमप्राप्त आहे.मात्र जत तालुक्यात असा नियमच गायब केल्याचे समोर येत आहे. किरकोळ शेतकऱ्यांची तक्रार होताच ठेकेदाराकडून गटारी काढण्याचे सोडून दिले जाते.परिणामी पावसाळ्यात रस्ता गटारी/नाले बनल्या जात आहे.याला भष्ट्र अधिकाऱ्यांचा पाठिंबा असतोच.पुढे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा निकृष्ट कामे लादली जात आहेत.



जत तालुक्यातील अनेक रस्त्यावर असे साईट पट्ट्यावरच पाण्याचे डबके तयार होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.