महावितरणने जळालेले टिसी तात्काळ बदलून द्यावेत ; दिनकर पंतगे

0

जत,संकेत टाइम्स : अनेक दिवस जळालेल्या टिसीबाबतची उदासीन असणाऱ्या महावितरणच्या कार्यालयावर कामागार सेनेच्या शिष्ठमंडळाने धडक दिली.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विज समस्या निर्माण होऊ नये,यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी केले.

पंतगे म्हणाले,जत तावुक्यातील दरिकोणूर सबस्टेन अतर्गंत येणाऱ्या सोरडी गावातील पाझर तलाव क्रंमाक १ परिसरातील टिसी सातत्याने बंद पडत असून महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार मोहन गायकवाड,श्री.कागवाडे,सुरेश घोडके,हिराण्णा सिध्दरेड्डी अशा काही शेतकऱ्यांनी आम्हच्याकडे केली होती.त्यांनी मांडलेली गाऱ्हाणे घेऊन आम्ही दरिकोणूर सब स्टेशनचे कनिष्ठ अभियंता श्री.राठोड,श्री.खेडकर यांची भेट घेतली.टिसी जळाल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी लाख रूपये गोळा करून संबधित कर्मचाऱ्याकडे दिले होते.मात्र फेंब्रुवारीपासून टिसीचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याचे पंतगे व शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यांनी तात्काळ संबधित कर्मचाऱ्यांशी संपर्क करत दोन दिवसात टिसी बसविण्यात येईल,असे आश्वासन दिले.

 

Rate Card

यावेळी मोहन गायकवाड,सोमनाथ पाटील,अक्षय कोळी,हिराण्णा सिध्दरेडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या टिसीसह महावितरणबाबत समस्या असल्यास,संपर्क करावा असे आवाहनही पंतगे यांनी केले.

तात्काळ टिसी बदलून द्यावेत

सततच्या अवर्षणामुळे जत तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.त्यामुळे विज पुरवठ्यामुळे त्यांना अडचणी येऊ नयेत,यांची खबरदारी महावितरणने घ्यावी.दुसरीकडे शेतकऱ्यांनीही विज बीले भरून महावितरणला सहकार्य करावे.

– दिनकर पतंगे,प्रदेश उपाध्यक्ष, कामगार सेना

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.