महावितरणची वीजचोरांवर करडी नजर,या विभागात 81 आकडेबहाद्दरांवर कारवाई

0
सांगली,संकेत टाइम्स : महावितरणची वीजचोरांवर करडी नजर आहे. महावितरणने वीजवाहिन्यांवर सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. सांगली मंडळातंर्गत विटा विभागातील कडेगाव शाखा कार्यालयाच्या विहापूर व शाळगावातील 81 आकडेबहाद्दरांवर कारवाई केली. वीजचोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या केबल्स, पेट्या इ. साहित्य जप्त केले. दरमहा साधारणपणे 5 लक्ष रूपयांची चोरी हे आकडेबहाद्दर करीत होते.

               वाढत्या वीजचोरीचा फटका महावितरणच्या महसूलासह प्रमाणिक ग्राहकांना बसतो. वीजचोरीमुळे वीजयंत्रणेवरील भार वाढून रोहित्र जळणे, कमी दाबाचा वीजपुरवठा होणे, प्रसंगी वीजअपघात अशा समस्या ओढवतात. यापुढील काळात वीजचोरीविरोधात सातत्यपुर्ण कारवाई करण्यात येणार आहे.

विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार वीजचेारी हा गुन्हा आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी वीजवापराच्या तीनपट ते सहापट आर्थिक दंडाची व सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत तुरूंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. तेव्हा अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीजेचा वापर करावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

विहापूर व शाळगावात राबविण्यात आलेली वीज चोरी मोहिम कार्यकारी अभियंता श्री.विनायक इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता श्री.शशिकांत पाटील, सहाय्यक अभियंता श्री.प्रितेश सोनार व वीज कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.