वाढत्या वीजचोरीचा फटका महावितरणच्या महसूलासह प्रमाणिक ग्राहकांना बसतो. वीजचोरीमुळे वीजयंत्रणेवरील भार वाढून रोहित्र जळणे, कमी दाबाचा वीजपुरवठा होणे, प्रसंगी वीजअपघात अशा समस्या ओढवतात. यापुढील काळात वीजचोरीविरोधात सातत्यपुर्ण कारवाई करण्यात येणार आहे.
विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार वीजचेारी हा गुन्हा आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी वीजवापराच्या तीनपट ते सहापट आर्थिक दंडाची व सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत तुरूंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. तेव्हा अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीजेचा वापर करावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
विहापूर व शाळगावात राबविण्यात आलेली वीज चोरी मोहिम कार्यकारी अभियंता श्री.विनायक इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता श्री.शशिकांत पाटील, सहाय्यक अभियंता श्री.प्रितेश सोनार व वीज कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.




