दहावी नंतरच्या पॉलीटेक्नीक डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

0
Rate Card
सांगली :  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत इयत्ता दहावीनंतर प्रथम वर्षासाठी व बारावी तसेच आय.टी.आय. नंतर थेट व्दितीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया 2022-23 सुरू झाली आहे. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन मिरज चे प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे यांनी दिली.

पॉलीटेक्नीक प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी मुदत 2  ते 30 जून 2022, तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्दी 3 जुलै 2022, आक्षेप नोंदणीची मुदत 4 ते 6 जुलै 2022 व अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्दी 7 जुलै 2022.   प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे पुढीलप्रमाणे. जात/जमात प्रमाणपत्र, जात/जमात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलअर प्रमाणपत्र (प्रमाणपत्र दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वैध असलेले), अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, सैन्यदलातील प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्न बँक खाते.

पॉलीटेक्नीक डिप्लोमा ही अशी टेक्नीकल पदविका मानली जाते त्यामुळे  तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ नोकरी देत नाही तर इतर अनेक प्रकारच्या उच्च   शिक्षणासाठी अभ्यासक्रमांसाठीही मार्ग खुला करतो व उद्योगव्यवसायालाही चालना देतो. शासकीय तंत्रनिकेतन, मिरज द्वारे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता इयत्ता १० वी १२ या नंतर प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका तसेच आयटीआय विद्यार्थ्यांना आता पॉलीटेक्नीकच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेशाची सुविधा निर्माण झाली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना जागृत करण्याकरीता मार्गदर्शन करण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबतचे मुख्य टप्पे, प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे व महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती संदर्भात शासकीय तंत्रनिकेतन मिरज या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने या संदर्भात अधिक माहिती संचालनालयाच्या www.dtemaharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे यांनी दिली. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संबंधित विद्यार्थी व पालक यांनी शासकीय तंत्रनिकेतन, मिरज येथील प्रवेश समितीमधील अधिव्याख्याता सायन्स चेतन पगारे यांच्या ७५८८७३९८२३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.