फळझाड लागवड ; जत,कठेमहांकाळ तालुक्यातील लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत  

0
सांगली,संकेत टाइम्स :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शासन निर्णयातील तरतुदीनुसार वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृतमहोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड व फुलपिक लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत सुचना प्राप्त झाल्या आहेत. या योजनेचा फळपिक व फुलपिकांचा लागवड करण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे. जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी प्रस्ताव तात्काळ ग्रामपंचायतीमार्फत तालुका कृषी कार्यालयामध्ये जमा करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जत यांनी केले आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच (विकसीत जाती), कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबू, साग, जडोफा, गिरीपुष्प, कडीपत्ता, कडूलिंब, सिंधी, शेवगा, हादगा, पानपिंपरी, केळी (3 वर्ष), ड्रॅगनफ्रुट, ॲव्हाकॅडो, द्राक्ष, चंदन, खाया, निम, चारोली, महोगनी, बाभूळ, अंजन, खैर, ताड, सुरू, रबर, महारूख, मँजियम, मेलिया डुबिया, तुती (मलबेरी), ऐन, शिसव, निलगिरी, सुबाभुळ, शेमी, महुआ, गुलमोहर, बकान निब, चिनार, शिरीष, करवंद ही फळपिके/वृक्ष, गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा ही फुलझाडे, अर्जुन, असान, अशोका, बेहडा, हिरडा, बैल, टेटु, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइन, शिवन, गुग्गुळ, बिब्बा, करंज ही औषधी वनस्पती, लवंग, दालचिनी, मिरी, जायफळ या मसाल्याच्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

लाभार्थी निवडीचे निकष अत्यल्पभुधारक, अल्पभुधारक, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण असे असून लाभार्थ्यांचे जॉबकार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 खाते उतारा, अल्पभुधारक दाखला ही आवश्यक कागदपत्रे आहेत. 
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.