नियमांचे पालन करणाऱ्या पतसंस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे ; ना.बाळासाहेब पाटील

0
सातारा,संकेत टाइम्स : पतसंस्थांना आर्थिक शिस्त लागावी व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाकडून नियमांचे वेळोवेळी आदेश काढले जातात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सहकारी संस्थाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
Rate Card
श्री. पाटील म्हणाले,  जिल्ह्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. बॅकांच्या ठेवीवर संरक्षण मिळते तसेच पतसंस्थांच्या ठेवीवर संरक्षण कसे मिळावे यासाठी सहकार विभागाकडून अभ्यास करण्यात आला आहे. बँका ज्या प्रमाणे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे त्या प्रमाणे पतसंस्थांनी काळा प्रमाणे बदले पाहिजे. संस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी आर्थिक शिस्तही पाळली पाहिजे.
ज्या उद्देशाने पतसंस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच उद्देशाने संस्था चालवावी. गेल्या दोन-अडीच वर्षात कोरोना संकटामुळे अनेक संस्थांना अडचणी आल्या. संस्थांना आर्थिक शिस्त लागावी व संस्था वृद्धीगत व्हावी यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहे. सहकारी संस्थांनी दूरदृष्टी ठेवून लोकांच्या हितासाठी कामे करावे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
श्री. क्षीरसागर म्हणाले, आजची कार्यशाळा ही पतसंस्था संचालक मंडळ यांना दिशा देणारी ठरणार आहे. महाराष्ट्राचा विकासाचा पाया हा सहकार विभागावर आहे, प्रत्येक माणूस हा सहकारी विभागाशी जोडलेला आहे त्यामुळे सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण पारदर्शी झाले पाहिजे. नियामक मंडळाचे जे -जे परिपत्रक काढले आहेत त्याचा अभ्यास करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. सहकार विभागाने कायदे  आहेत त्याचे पालन करा.
आयुक्त श्री. कवडे म्हणाले, पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना संस्था कशा पद्धतीने चालवावी यासाठी आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार चळवळीला 100 वर्षाहून अधिकचा इतिहास आहे. सहकार विभाग शहरी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेलाआहे. पतसंस्थेचा कारभार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही असे काम करावे.

 

बँकेकडून कर्ज पुरवठा करत असताना त्याची पत तपासली जाते तसेच पतसंस्थेकडून पत तपासण्याचे मेंबरशिप मिळावी यासाठी आरबीआयकडे पत्र व्यवहार  सुरु आहे. पतसंस्थांचे पदाधिकारी जनहिताचे व देश हिताचे काम करीत आहे. या संस्थांमुळे जीवनात आनंदाबरोबर आर्थिकस्तर सुधारण्यात मदत होत आहे. जनमाणसात आपल्या संस्थेबाबत विश्वासाहर्ता वाढावी यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.