गुड्डापूर येथील श्री दानम्मादेवी देवस्थान,’देवीस ईट राईट इंडीया’चे मानांकन

0

सांगली : ईट राईट इंडीया अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 27 हॉटेलना स्वच्छतेचे मानांकन प्राप्त झाले आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी या 27 हॉटेल्सना “हायजिन रेटींग” चे प्रमाणपत्र जारी केले आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.दरम्यान भोग अंतर्गत जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी देवस्थान, देवीस ईट राईट इंडीया चे मानांकन प्राप्त झाले आहे.

हायजिन रेटींग प्रमाणपत्र देतेवेळी थर्ड पार्टी ऑडीट करून मानांकन दिले जाते. मानांकनामुळे हॉटेलचा दर्जा इतर हॉटेलपेक्षा उंचावला आहे. अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयाने ईट राईट इंडीया अंतर्गत 6 कैम्पसना FSSAI मानांकन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. या सर्व कॅम्पसना ईट राईट इंडीया चे मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील तुरची पोलिस ट्रेनिंग सेंटर, तुरची, पलूस तालुक्यातील फॉरेस्ट अॅकेडमी कुंडल व चितळे डेअरी, भिलवडी, भारती विद्यापीठ सांगली, जिल्हा परिषद कॅन्टीन सांगली, सिव्हील हॉस्पिटल सांगली यांचा समावेश आहे.

भोग अंतर्गत जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी देवस्थान, देवीस ईट राईट इंडीया चे मानांकन प्राप्त झाले आहे.तसेच स्वच्छ व ताजे भाजीपाला मार्केट अंतर्गत मिरज व सांगली येथील महानगरपालिके अंतर्गत येणारे मिरज लक्ष्मी मार्केट भाजी मंडई व जुनी भाजी मंडई, पेठ भाग, सांगली यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. जुनी भाजी मंडई, पेठ भाग, सांगली व मिरज लक्ष्मी मार्केट भाजी मंडई यांना स्वच्छ व ताजे भाजीपाला मार्केट असे मानांकन मिळाले आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकी करणाऱ्या स्वच्छ खाऊ गल्ली अंतर्गत मिरज लक्ष्मी मार्केट व संभा भेळ कॉर्नर, सांगली यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यापैकी स्वच्छ रोडवर अन्न पदार्थ विक्री करण्याचे मानांकन मिरज लक्ष्मी मार्केटला प्राप्त झाले आहे.

Rate Card

दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन व प्रक्रिया करणाऱ्या डेअरीचे थर्ड पार्टी कडून ऑडीट करण्यात आले असुन मानांकनासाठी त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामध्ये रामविश्वास डेअरी, सांगलीवाडी, थोटे डेअरी, आष्टा,  पाटील डेअरी, भिलवडी, श्रीमंत बाबासाहेब देशमुख मिल्क प्रॉडक्ट, आटपाडी यांचा समावेश आहे. त्यामुळे या डेअरीचा दर्जा इतर डेअरीपेक्षा उंचावणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.