कु. शांभवी कुलकर्णी नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र

0
जत,संकेत टाइम्स : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022  चा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. डफळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा नं 2 मधील विद्यार्थीनीने या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. जत तालुक्यातून सहा विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले आहेत. त्यापैकी डफळापूर शाळेतील एक विद्यार्थ्यांनी आहे.शाळेतील शांभवी गोविंद कुलकर्णी ही नवोदय विद्यालय, पलूस येथील प्रवेशासाठी पात्र झाली आहे.

 

तिचे  केंद्राचे केंद्रप्रमुख रतन जगताप, मुख्याध्यापक अरविंद बंडगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोटू शिंदे,उपाध्यक्ष हणमंत कोळी  व सर्व सदस्य यांनी कौतूक केले. तसेच शाळेमार्फत तिचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
तिला उदयोगरत्न संकपाळ, अलका पवार ,शंकर कुंभार, दिपाली पट्टणशेट्टी, रेखा कोरे, सुषमा चव्हाण,अजय डोंगरे तसेच वडील गोविंद कुलकर्णी व आई वंदना कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.  या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.