राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षपदी डॉ.गीता कोडग

0



जत,संकेत टाइम्स : आवंढी ता.जत येथील माजी पोलिस पाटील डॉ.सौ.गीता आण्णासाहेब कोडग यांची जत तालुका महीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महीला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र पक्षनिरीक्षक भारती शेवाळे यांच्याहस्ते डॉ.गिता कोडग यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,महीला जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,ओएसडी अमोल डफळे, माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार,जत तालुकाध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील शिंदे,बाजी केंगार व डॉ. आण्णासाहेब कोडग उपस्थित होते.

दरम्यान जत उत्तर भागात राष्ट्रवादीला बळकटी देण्याचा प्रयत्न तालुक्यातील नेत्याकडून करण्यात येत आहे.

डॉ.गीता कोडग म्हणाल्या,जत‌ तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे विचार तळागाळात पर्यंत‌ पोहचवून,महिला आघाडी बळकट करण्याचा माझा प्रयत्न राहील.


Rate Card


राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षपदी निवडीचे डॉ.गीता कोडग यांना पत्र देताना पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.