निर्मात्यांना चित्रपट ओटीटीवर आणण्याची लागली घाई

0
बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शकापासून ते वितरकापर्यंत प्रत्येकजण असुरक्षिततेच्या भावनेशी सामना करत  आहेत.  त्यामुळे ही मंडळी त्यांच्या चित्रपटाबाबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच त्यांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. नफा मिळाला नाही तरी चालेल, परंतु खर्च निघाला पाहिजे,अशी त्यांची भावना झाली आहे. या असुरक्षिततेमुळे निर्माते चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ओटीटीशी करार करत आहेत.

 

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट यशस्वी झाला तरी महिनाभरानंतरही तो ओटीटीवर येतोच.  त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये दीर्घकाळ चालणारा चित्रपटांचा कालावधीही आता संपत चालला आहे.चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा करार केला जातो, किती महिन्यांनंतर तो ओटीटीवर आणायचा,हे ठरायचे. यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी असायचा.  परंतु असुरक्षिततेमुळे अनेकदा वितरकासह निर्माते नियोजित तारखेपूर्वीच चित्रपट ओटीटीवर दाखवतात.  ‘धाकड’ हा चित्रपट ठरलेल्या वेळेपूर्वी ओटीटीवर आला आहे.

 

त्याचप्रमाणे ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपटही नियोजित कालावधीपूर्वी ओटीटीवर आला आहे.  असेही काही चित्रपट होते जे यशस्वी असूनही करारानुसार ओटीटीवर दाखवले गेले.  त्यापैकी ‘भूल भुलैया-2’ सिनेमागृहातही कमाई करत होता.  राजमौली यांच्या मते, कोणताही चित्रपट तीन महिन्यांनंतरच ओटीटीवर प्रदर्शित झाला पाहिजे.  यामुळे राजामौली यांनी त्यांचा चित्रपट ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ 2’  ओटीटीवर लवकर प्रदर्शित केला नाही, कारण त्यांच्या मते चित्रपट पाहण्याची खरी मजा सिनेमागृहात आहे.  अनेक मोठे चित्रपट आणि हॉलिवूड चित्रपट ओटीटीवर दाखवले जात नाहीत कारण ते सिनेमागृहांमध्ये चांगली कमाई करतात.  त्यांना ओटीटीची गरज नाही.

 

तीन वर्षांत जिथे कोविडमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांना वेड लावले आहे, तिथे आता सिनेमा हॉल पूर्ण उघडूनही प्रेक्षक पोहोचत नाहीत.  बरं, यामागे अनेक कारणं आहेत.  यापैकी कोविड-19 मुळे आरोग्याची चिंता, महागडी तिकिटे आणि ओटीटीवरील चांगली साम्रगी यामुळे प्रेक्षक आता हुशार झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहात चांगला चित्रपट आल्यावरच जातात.  त्यातही उत्तम ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स कामगिरी असावी किंवा हॉलीवूडचा चित्रपट असावा.
पण या सगळ्यांसोबत चित्रपटगृहांमध्ये चित्रपट अपयशी होण्याचे कारण म्हणजे प्रत्येक चित्रपट महिनाभरानंतर ओटीटीवर दाखवला जातो.  पूर्वी कोणताही चित्रपट चार ते सहा महिन्यांनी ओटीटीवर किंवा टीव्हीला  दाखवला जायचा. हळूहळू ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा कालावधी तीन महिन्यावर आला. पुढे तो आठ आठवड्यांचा झाला.

 

त्यामुळेच सिनेमागृहात जाऊन आपला पैसा आणि वेळ वाया घालवण्याऐवजी तोच चित्रपट ओटीटीवर पाहायला प्रेक्षकांनी सुरुवात केली आहे.  याच कारणामुळे अनेक चित्रपट चांगले असूनही दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातच दम तोडायला सुरुवात केली.  ‘जुग जुग जिओ ‘असो, ‘रनवे 34’ अथवा ‘जर्सी’ असो, जवळपास प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चालत नाही.

 

 

अपवाद फक्त ‘भूल भुलैया 2’ चा आहे. त्याने चांगला व्यवसाय केला.  यामागचे खास कारण म्हणजे आजही प्रेक्षकांमध्ये हॉरर चित्रपटांचे आकर्षण कायम आहे.  याशिवाय अभिनेता कार्तिक आर्यनचे चाहतेही खूप आहेत.  ‘भूल भुलैया 2’, चांगली कामगिरी करूनही, एक महिन्यानंतर ओटीटीवर आला कारण निर्मात्यांनी आधीच एक महिन्याचा करार केला होता.  ‘भूल भुलैया 2’ ची कमाई चांगली असूनही, तो ओटीटीवर प्रदर्शित झाला.यावरून हे स्पष्ट होते की, ही व्यवस्था लवकरात लवकर सुधारली नाही, तर तो दिवस दूर नाही जेव्हा सिनेमागृहांना मोठ्या तोट्यातून जावे लागेल.

 

प्रेक्षकांनी सिनेमागृहांकडे पाठ फिरवणं हे चित्रपटसृष्टीला शोभणारे नाही.  अशा परिस्थितीत निर्मात्यांनी आपली सद्यस्थिती भक्कम करण्याऐवजी भविष्याची चिंता करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तोट्यातील चित्रपटगृहे बंद पडू लागली तर त्यांचे चित्रपट कुठे प्रदर्शित होणार?  त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट आल्यानंतर सहा महिन्यांनंतरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचे प्रदर्शन ठेवायला हवे आहे.
– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.