बिळूर पंचायत समिती गणातून एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील इच्छुक !

0
बिंळूर, संकेत टाइम्स : नुकतेच जत पंचायत समिती व सांगली जिल्हा परिषद निवडणूकीचे आरक्षण सोडत पार पडले आहे.या निवडणूका कधी होतील हे अजून निश्चित नसले तरी या निवडणूकीत सत्ता आपल्याच हाती कशी येईल किंवा कशा पध्दतीने सत्ता कायम टिकून राहील याकरिता सत्ताधारी व विरोधक प्रयत्नशील असतानाच बिळूर पंचायत समिती गणातून माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक, एकुंडीचे लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील हे भाजपा कडून इच्छुक आहेत. सरपंच बसवराज पाटील हे माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात.

 

बसवराज पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षापासून जत तालुक्यात अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. ते मनसे अध्यक्ष असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांना तालुक्यात आणून दुष्काळग्रस्त जनावरांसाठी मोफत चारा छावणी चालवली, एकुंडीसह परिसरातील गावातील लोकांची रेशनकार्ड, शेती वाटणीपत्र, गोरगरिब नागरिकांना शासनाच्या विविध सवलती मिळवून देणे, एकुंडी गावात सरपंच म्हणून काम करत असताना अनेक वर्षापासून रखडलेले रस्ते मोकळे करून पांणद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. दुष्काळात मोफत पाणी वाटप केली आहे.

 

यासह सामाजिक-धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेऊन शक्य होईल तेवढी पदरमोड करून कार्यक्रम साजरे करणे, प्रत्येकाच्या सुखदुखात सामिल होणे, अशी कामे करून जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून लोकप्रिय ठरलेले सरपंच बसवराज पाटील यांना भाजपाने उमेदवारी निश्चिती मानली जात आहे.

 

 

माजी आमदार विलासराव जगताप यांनी युवकांना संधी देण्याचे नुकतेच जाहीर केले आहे.बिंळूर पंचायत समिती गणात सक्षम,युवा संरपच,क्रियाशील संघटन,सामाजिक बांधिलकी असणारे बसवराज पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल व ते विजयी होतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.
एंकुडीला संधी द्यावी 
बिंळूर पंचायत समिती गण,जिल्हा परिषद गटात अनेक वर्षे एंकूडी गावाने भाजपाच्या उमेदवारांना चांगले मताधिक्य देत विजयी केले आहे. यंदा हा मतदार संघ ओपन झाल्याने एंकुडीला संधी द्यावी.
– बसवराज पाटील,लोकनियुक्त संरपच एंकुडी
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.