गतवर्षीच्या अवकाळीची भरपाईची जत तालुक्यात प्रतिक्षा

0
संख(रियाज जमादार) : संख जत तालुक्यात गतवर्षी अवकाळी पासवाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. प्रशासनाच्यावतीने पंचानामे करुनही शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळत नसल्याने नाराजीचे वातावरण
आहे.तालुक्यात गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने फ्लॉवरिंग स्टेजमधील द्राक्ष बागांचे व बेदाण्याचे नुकसान झाले.
२४ गावातील ५३० शेतकऱ्यांचे २००.४ हेक्टर द्राक्षे
बागांचे नुकसान झाले. २ हजार हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला.तालुक्याच्या पूर्व भागातील उमदी,सिद्धनाथ, संख, बालगाव, हळ्ळी,कागनरी, बेळोंडगी, मुचंडी जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक या परिसरात दर्जेदार बेदाणा होते.तालुक्यातील बेळोंडगी येथील १०० एकरातील बागा दावण्या रोगाने वाया गेल्या आहेत. द्राक्षेबागांचे उत्पादन ३५ टक्क्यांपर्यंत घटले.तत्कालीन जिल्हा अधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. कृषी, महसूल विभागाकडून पंचनामा केला, परंतु आजतागायत शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यां मध्ये नाराजी आहे.
मागील वर्षाची अवकाळी पावसाने द्राक्षे बागेचे व बेदाण्याचे नुकसान झाले होते.त्याची भरपाई मिळाली नाही.सध्या रिमझिम पावसाने दाक्ष,डाळिंब, तूर पिकांवर रोग पडला आहे. पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.
– सोमनिंग बोरामणी, द्राक्ष
बागायतदार, बेळोंडगी
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.