गोमुत्राचे फायदे

0

गोमुत्राचे फायद

डॉ. दादासाहेब खोगरे,
कृषी विज्ञान केंद्र, तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली
मोबाईल नंबर:9370006598

भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.
गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.
१. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
४. गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
७. सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
९. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
१०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. 5 पाने तुळशीची, 5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५. 2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.
४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही.
४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
४२. प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या.
४३. किडनी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.
गोमुत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता.

 

Rate Card

गोमातेचे विशेष महत्व स्वामी म्हणतात.. गाईच्या ‘या’ अंगाला स्पर्श केल्याने घरात असलेलं अठरा विश्वे दारिद्र्य कायमच दूर होईल… करोडपती व्हाल..!!!
मित्रांनो, शास्त्रानुसार गाईच्या शरीरात ३३ कोटीे देवी देवतांचे वास्तव्य असते म्हणून जी व्यक्ती गाईची नित्य पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी-देवतांची कृपा असते. जे लोक गाईची सेवा करतात व गायीला देवी मानतात. देवी त्यांच्या दुः खांचे हरण करते. गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते.
आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानलेलं आहे. ज्यांच्या घरात गाई असतात त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात. आपल्या हिंदू धर्मानुसार गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास आहे असे मानले जाते. म्हणून गायीचे पूजन केले की ३३ कोटी देवी-देवतांचे पूजन केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. गाईवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो. गाई च्या पाठीच्या वरच्या भागात सूर्य केतू नाडी असते, जी सूर्याच्या किरणांपासून रक्तात सूर्यक्षर निर्माण करते.
हे सूर्यक्षर गाईच्या दुधात उतरत असते म्हणून गाईचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृतासमान मानले गेले आहे. या सुवर्ण क्षारा मुळेच गाईच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो त्यासाठी आपण आता जाणणार आहोत की, गाईच्या पूजनाने मनुष्याला कोण कोणते पुण्य फळाची प्राप्ती होते तसेच घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणत्या उपाय करावे तसेच गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते.
घरामध्ये स्वयंपाक झाला की सर्वात अगोदर गाईला पोळी खायला द्यावी त्यानंतरच सर्वांनी खावी यामुळे घरामध्ये शांतता राहते. वाद-विवाद भांडण तंटा दूर होतात. अन्नग्रहण करण्यापूर्वी आपल्याला गोमातेला भाकरी खाऊ घालायचे आहे. जर आपण दररोज न चुकता एखादी भाकरी गोमातेला खाऊ घातली तर 33 कोटी देवी-देवतांना चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल, आपल्या घरातील सर्व संकटांपासून आपली मुक्तता होईल व आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल.
गाईपासून मिळणारे पंचगव्य हजारो रोगावर गु णकारी औषध आहे. याचे सेवन केल्याने असाध्य रोगांवर मात करता येते. पूजापाठ हवन पंचगव्या नसेल तर त्यात यश मिळतं नाही. गायीच्या शेणा पासून तयार केलेल्या गोव-या सकाळ-संध्याकाळ मंदिरात किंवा घरात जाळून त्याचा धूरकेल्यास वातावरण शुद्ध होते यामुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते.
गाईचे दान करणे शास्त्रात खूप शुभ मानले जाते जर आपल्या मंगळाची दशा वाईट असेल तर एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाला गाय दान करावी. न वग्रहांची शांती व शनी ग्रहाची स्थिती करायची असेल तर एका काळ्या गाईचे दान जरूर करा यामुळेच सर्व प्रकारच्या संकटांपासून आपली सुटका होते व शनी देवांच्या कृपेमुळे सर्वकाही व्यवस्थित होते.
असे म्हणतात सूर्यास्तानंतर ज्यावेळी गाय रानातून घरी परतत असतात त्यावेळी त्यांच्या पायामध्ये हवेतून धुळीचे कण अडकतात, त्या धुळीमुळे व्यक्तीच्या पापांचा सर्वनाश होतो. ज्या विद्यार्थ्यांना खूप राग येतो, जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे आहेत तसेच जे बोलू शकत नाहीत अशा व्यक्तींनी गाईला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते व सर्व प्रकारच्या अडी अडचणी पासून आपली सुटका होते.
जर आपले एखादी कार्य पूर्ण होत नसेल तर काहींना काही अडथळे येत असेल तर गाईला पोळी खायला द्यावी व तिच्या कानात आपली इच्छा सांगावी तसेच गायीची नित्यनेमाने पूजा केल्यास माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व घरातील आर्थिक स्थिती म’हजबूत होते. उन्हाळ्यात, हिवाळ्यात जर दारामध्ये गाय आली तर तिला जरूर पाणी पाजावे यामुळे आपल्या सर्व रोगांपासून सुटका होते तसेच थंडीच्या दिवसात गाईला गुळ खाऊ घालावा परंतु उन्हाळ्यामध्ये गुळ खाऊ घालू नये.
पितृदोष पासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येला गाईला गुळपोळी व हिरवा चारा जरूर खायला द्या यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात व त्याच बरोबर नवग्रहांची शांती होते. जर घरामध्ये लहान मुले ह ट्टी असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा राग येत असेल तर दारात आलेल्या गाईला त्यांच्या हाताचे भोजन गाईला द्यावे यामुळे खूप फरक जाणवतो गाईच्या गळ्यात घंटी जरूर बांधा कारण गाईच्या गळ्यात घंटी बांधल्यामुळे गाईचा आवाज होतो. गाईच्या पोटा मध्ये तेहेतीस कोटी देवांचे पुण्य आपल्याला मिळते. गायीच्या शेणात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. तर गाईच्या मूत्रात देवी गंगेचे वास्तव्य असते तसेच गाईच्या दुधात सुवर्ण तत्व असतात म्हणूनच गाईच्या दुधाचे सेवन जरूर करावे.
गाईच्या पाठीवर उंच वट्यावर सूर्य केतू नाडी असते, रोज सकाळी गाईच्या या उंचवट्यावर हातफिरवल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या आर्थिक समस्या ही नष्ट होतात आणि दारिद्र्य दूर जाते त्याच बरोबर आपल्या सर्व रोगांचा नाश होतो. जर नवीन जागा घर बांधायचे असेल तर त्या जागी गाय कींवा वासरू काही दिवस तेथे राहू द्यावे यामुळे त्या जागेवर असलेले सर्व रोग दोष दूर होतात. गाय ज्या जागी बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतेही वाईट शक्‍ती प्रवेश करत नाही.

 

डॉ. दादासाहेब खोगरे,
कृषी विज्ञान केंद्र, तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली
मोबाईल नंबर:9370006598

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.