डफळापूरमधिल एटीएम फोडल्याप्रकरणी दोघे गजाआड | एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग

0
जत, संकेत टाइम्स : डफळापूर (ता.जत ) येथे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघाना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संयशयित आरोपी सचिन यशवंत कोळेकर (वय ३२, रा. रामपूर) हा सध्या कवठेमंहकाळ पोलीस दलात वाहन चालक म्हणून कार्यरत आहे. त्याचासह त्याचा मित्र सुहास मिरसो शिवशरण (वय ३५, रा.रामपूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास गुंतागुंतीचा बनला होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण व पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.दोन्ही संशयितांना जत पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

 

शुक्रवारी (दि.२९ जुलै) मध्यरात्री डफळापूर येथील सांगली रोड कडेला असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या  शाखेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न कोळेकर व त्याचा मित्र शिवशरण या दोघांनी केला. दोघांना एटीएम मशीन फोडता आली नाही. परंतु, ते सीसीटीव्ही  दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद असल्याने चोरीचा छडा लावणे शक्य झाले. एटीएम मशीन हे गाळ्याच्या बाहेर टाकले होते. एटीएम मीशनमधील पैशावर डल्ला मारू पाहणाऱ्या दोघा संशयिताच्या हाती काहीच लागले नाही. मात्र या धक्कादायक प्रकरणाची चर्चा पोलीस खात्यासह तालुक्यात सुरू आहे.

 

दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान पुढील तपास जत पोलीसाकडून सुरू आहे.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.