आष्टात विजेचा धक्का लागून विज कर्मचाऱ्यांचा मुत्यू

0

आष्टा,संकेत टाइम्स : आष्टा ता.वाळवा येथे विजेचा शॉक लागून एका कर्मचाऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.घटना गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.अजित बनसोडे रा.भडकंबे असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी,आष्टा स्टँड चौकात वीज दुरुस्ती सुरू होती.अजित बनसोडे विज खांबावर चढून दुरूस्ती करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने त्यांचा विजेचा तीव्र झटका लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ते गेली आठ वर्ष वीज वितरण कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम करत होते.

 

Rate Card

अर्धा तास त्यांचा मृतदेह विजेच्या तारांवर लटकत होता,त्यानंतर वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन मृतदेह खाली उतरला व पोस्टमार्टम करता सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.दरम्यान दोन महिने मागे विजेच्या धक्क्याने असाच एका कामगाराचा मृत्यू झाला होता,तरीही महावितरणं कडून खबरदारी घेतली नाही.परिणामी दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.