जत पश्चिम भागात तूफान पाऊस | पुर्व भाग अजून कोरडाच ; पश्चिम भागातील ओढांना पूर

0
Rate Card

जत, संकेत टाइम्स : गुरूवारी रात्री जत तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अभूतपूर्व पावसामुळे शेती, पिकांची मोठी हानी झाली. ठिकठिकाणी द्राक्ष, डाळिंब बागांत पाणी साचले आहे. पावसाने अनेक बागांची वाताहात झाली आहे.डफळापूर, बिळूरसह अनेक गावात थेट उभी पिके,मोठे वृक्ष वाहून गेले आहेत.अनेक जून्या घराची पडझड झाली आहे.पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या पुर्व भागातील अनेक गावांना दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.गेल्या दोन दिवसापासून डफळापूर, बिळूर परिसरात कमी अधिक पाऊस सुरू होता.गुरूवारी रात्री मात्र तूफान पाऊस झाला.दरम्यान तालुक्यातील अधिकाऱ्यासह आमदार विक्रमसिंह सांवत यांनी अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

 

View this post on Instagram

A post shared by SANKET TIMES (@dailysankettimes)

डफळापूर,अंकले,बाज,बेंळूखी,खलाटी,मिरवाड,कुडणूर,शिंगणापूर,एकुडी,वज्रवाड,गुगवाड,सिंदूर,बिळूर,मेंढीगिरी,खोजानवाडी,येळदरी याही परिसरातील संख,मुंचडी,व्हसपेठसह काही भागात दमदार पाऊस झाला आहे. जवळपास सर्वच ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. ठिकठिकाणी रस्ते, पूल खचले आहेत.पुलावरून पाणी जात असल्याने काही मार्ग बंद झाले होते. अनेक गावांतील घरे किंवा घरांच्या  भिंती पडल्या आहेत. तालुक्याला यंदा वरूणराजाने झोडपून काढले आहे. परतीच्या मोसमी पावसाचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच तालुक्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाला आलेली खरीप पिके मात्र शेतात पाणी साठून राहिले आहे.

 

तालुक्यात मान्सूनचा पाऊस पडत नाही. परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडतो. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान तीनशे मिलिमीटर आहे. मात्र दोन वर्षांपासून सरासरीच्या दुप्पट पाऊस कोसळतो आहे. गुरूवारी २९ मिमी पावसाची नोंद झाली असून १ जूनपासून शुक्रवार पर्यत २५२.८०मि.मी.पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

 

View this post on Instagram

A post shared by SANKET TIMES (@dailysankettimes)

या पावसाचा द्राक्ष डाळिंब, द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. डाळिंब बागात मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली आहे. जी फळे आली त्यांना पाकळी, करपा, फळकुज, तेलकट या बुरशीजन्य रोगांनी घेरले आहे. सततच्या पावसाने शेतकर्‍यांना औषध फवारणी करणे अवघड झाले आहे.

 

डफळापूर,बिळूर परिसरातील ओढे,त्याशिवाय गावोगावचे लहान-मोठे ओढे व नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.तालुक्यात किरकोळ घटना वगळता एकही दुर्घटना झाल्याची नोंद झालेली नाही. तालुक्यात नेहमी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे माळवदी घरांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, आता अतिवृष्टीच्या तडाख्यात ही घरे टिकलेली नाहीत. जादा पाऊस पडल्याने माळवदी घरांना गळती लागली आहे. अनेक घरांच्या जाडजूड  जुन्या भिंती कोसळून घरे पडू लागली आहेत.तालुक्यातही अनेक गावात घरांची पडझड झाली आहे. 

 

पावसाने अनेक रस्त्याच्या ओढा पात्रावरील पूल खचला आहे. अनेक रस्ते व पुलांचे भराव वाहून गेले आहेत.त्याशिवाय अनेक गावात तुफान पावसाचे पाणी पिकातून वाहिल्याने पिके,जमिनीचे काही भाग  वाहून गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.