अलकूड एस खूनातील चौघांना अटक | चोरीच्या पैशाच्या वादातून खून | संशयित चौघे नेर्लेचे

0
कवटेमहाकांळ : अलकूड एस ता.कवटेमहाकांळ येथे पुजाऱ्यांच्या खून प्रकरणातील संशयितांना पोलीसांनी २४ तासाच्या आत पकडले आहे.सदाशिव जगन्नाथ चौगुले (वय ३० रा.अलकुड एस) यांचा बुधवारी सांयकाळी ६ च्या सुमारास खून करण्यात आला होता.याप्रकरणी पोलीसांनी गतीने तपास करत यातील संशयित सौरभ विकास सीद (वय २१),विठ्ठल मधुकर डोंगरे (वय २०),श्रीकांत चंद्रकांत पाटील (वय २०),संकेत सोमाजी वाठारकर (वय १९,सर्वजण रा.नेर्ले ता.वाळवा)यांना ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी,बुधवार ता.१० रोजी सायकांळी ६ वाजण्याच्या दरम्यान सदाशिव चौगुले यांचा खून झाल्याचा गुन्हा कवटेमहाकांळ पोलीसात दाखल झाला होता.त्या अनुषंगाने कवटेमहाकांळ पोलीसांनी गतीने तपास सुरू केला होता.दरम्यान चौगुले यांचा खून नेर्लेतील चौघांनी केल्याची माहिती हवलदार दिपक गायकवाड यांना खास बातमीदाराकडून मिळाली होती.दरम्यान नेर्ले बस स्टँडवरून संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलीसांनी पकडले.

 

मयत सदाशिव चौगुले हे नेर्ले येथील वाघजाई मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत होते.संशयित हे सदाशिव हा सौंरभ सीद यांचे नातेवाईक होते.मयत सदाशिव यांने नेर्लेतील मंदिरात चोरी केली होती. याप्रकरणी कासेगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद होता. सदाशिव याला अटकही झाली होती.दरम्यान सदाशिव व संशयित यांच्यात मंदिरातील चोरलेली रोख रक्कम व पैसे परत देणेवरून वाद झाला होता.यावरून सदाशिव यांनी संशयितास धमकावले होते.
संशयित यांनी सदाशिव मारेल म्हणून साथीदार घेऊन बुधवारी अलकुड एस ते लंगरपेठ जाणाऱ्या रोडचे बाजूस रंगराव चौगुले यांच्या रानातील ओघळीमध्ये सदाशिव चौगुले यांचा धारदार शस्ञाने वार करून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम,अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सदिश शिंदे,सा.पो.नि.प्रशांत निशाणदार यांच्या पथकांने ही कारवाई केली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.