कवठेमहांकाळ : महांकाली उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय नानासाहेब सगरे यांच्या पत्नी श्रीमती सिंधुताई नानासाहेब सगरे (वय ८५) यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.कवठे महांकाळ येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महांकाली कारखान्याचे चेअरमन स्वर्गीय विजयराव सगरे व जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपती सगरे उर्फ बंडू मालक यांच्या त्या मातोश्री होत.तर महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे यांच्या सासूबाई तर युवानेते शंतनु सगरे यांच्या आजी होत.कवठे महांकाळ तालुक्याच्या विकासात तसेच महांकाली उद्योग समूहाचे स्थापनेमध्ये नानासाहेब सगरे व विजयराव सगरे यांच्या पाठीशी सिंधुताई सगरे या खंभीरपणे नेहमी उभ्या असायच्या.
त्यांच्या पश्चात मुलगा,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.रक्षा विसर्जन शनिवारी सकाळी आठ वाजता कवठे महांकाळ येथील लिंगायत स्मशानभूमी मध्ये होणार आहे.