दुहेरी हत्याकांडाने जळगाव हादरले | प्रेम प्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या 

0
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणाची बंदुकीने गोळी मारून तर तरूणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
तरुणीच्या 17 वर्षीय अल्पवयीन भावानेच दोघांचा जीव घेतल्यानंतर तो स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. वर्षा कोळी (वय 20, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूरा चोपडा) अशी मयत प्रेमीयुगलाची नाव आहेत.

 

Rate Card
चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन अल्पवयीन भावासह एक अशा दोन संशयितास ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.